रक्तदान शिबिर

एकता सहकारी पतपेढी, शिरलय आगाशी व हिंदुजा कामगार संघटना ह्यांच्या तर्फे रविवार दिनांक 15/03/2026 रोजी सकाळी ९:०० ते १:०० च्या दरम्यान नागरिकांसाठी रक्तदान शिबिर हिंदुजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात सुमारे 85 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. काही कारणास्तव 19 रक्तदात्यांचे रक्त ग्राह्य धरण्यात आले नसून, 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ह्या शिबिरासाठी बाहेरून 20 हुन जास्त कार्यकर्ते तसेच आपला स्टाफ, आपले अध्यक्ष फ्रान्सीस लोपीस साहेब, उपाध्यक्ष – आल्बर्ट डिसिल्वा साहेब, सचिव सुनील डाबरे, प्रिती लोपीस मॅडम, फेबी मॅडम, अंतोन कोरिया सर, सिल्व्हेस्टर घोन्सालवीस सर, जतीन गोवारी सर, आपले CEO संदेश सर DJM रेक्सीना मॅडम, सर्व AJM, तसेच गार्डवेल इडस्ट्रिज चे मालक विल्यम तुस्कानो सर, Thrmavison चे मालक मा. फ्रान्सीस तुस्कानो सर, सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्सी डाबरे सर नेल्सन डिसोझा, डॉमिनिक लोपीस आदी मान्यवर हजर होते.

त्याच वेळी हिंदुजा हॉस्पिटल तर्फे आपल्या पतपेढीला प्रशिस्त पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. ह्या पवित्र कार्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे व कार्यकर्त्यांची आम्ही मनापासून आभार मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More Articles & Posts