मोफत आरोग्य शिबिर

एकता सहकारी पतपेढी, शिरलय आगाशी तर्फे रविवार दिनांक 10/08/2025 रोजी ध्यानाश्रम राजोडी येथे सकाळी ९:०० ते १:०० च्या दरम्यान नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर जे.पी.हॉस्पिटल वसई यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात सर्व प्रकारच्या प्राथमिक तपासण्या, ECG,CBC(Blood Check-up) BP, RBS, SPO2 Dr. Consultation व इत्यादी चाचण्या करण्यात आल्या. तपासणी दरम्यान रुग्णांना योग्य तो उपचार व औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला.
या परिसरातील सुमारे ९० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.
आरोग्य माता चर्च राजोडी चे प्रमुख धर्मगुरु फा. सॅवियो डिमोटे यांनी प्रार्थनेने सुरुवात केली व फा. पिटर परेरा यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरास पतपेढी चे चेअरमन श्री. फ्रान्सिस लोपीस, सचिव श्री. सुनील डाबरे व संचालक यांनी उपस्थिती दर्शविली. पतपेढी च्या चेअरमन साहेबानी यावेळी नमुद केले की, अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराची आपल्या लोकांना गरज असून योग्य वेळी जर आपण आजाराचे निदान करू शकलो तर दुर्धर आजारापासून बचाव करता येईल. तसेच अशी अनेक शिबिरे पेतपेढी च्या माध्यमातून निरनिराळ्या ठिकाणी घेण्यात येतील असे जाहीर करण्यात आले
या शिबिरासाठी संचालक श्री. जेम्स रॉड्रिग्ज व सामाजिक कार्यकर्ते श्री. मेकॅन्जी डाबरे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

More Articles & Posts