उच्च शिक्षणाचा हात | एकता पतसंस्थेची साथ

आजच्या काळात अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याबद्दल उत्सुक आहेत. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या भविष्याचा योग्य दिशेने विकास व्हावा या उद्देशाने एकता सहकारी पतपेढी ने दिनांक 22 /11/2025 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत मुख्य कार्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी एक “स्टडी अब्रॉड सेमिनार” आयोजित करण्यात येत आहे.

या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना खालील विषयांवर सविस्तर माहिती दिली जाईल.

  • योग्य कॉलेज आणि कोर्स निवडण्याची पद्धत
  • प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता
  • शैक्षणिक कर्ज (Education Loan) कसे घ्यावे आणि परतफेड कशी करावी
  • फॉरेक्स (Foreign Exchange) विषयक माहिती – पैशांचे सुरक्षित व्यवहार कसे करावेत
  • परदेशात शिक्षण घेत असताना उपलब्ध पार्ट-टाईम जॉब्स, त्यासाठी लागणारी पात्रता व अर्ज प्रक्रिया
  • परदेशातील राहणीमान, खर्च आणि करिअरच्या संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन.

या सेमीनार चा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि परदेश शिक्षणाच्या संधींचा योग्य फायदा घेण्यास त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.

विद्यार्थ्यांनी या सेमिनारसाठी नोंदणी (Registration) करावी, जेणेकरून त्यांना अधिकृत प्रवेशपत्र आणि माहितीपत्रक मिळू शकेल.

आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

📞 संपर्क: 9130641055/7972884924

📧 – ektasahakaripatpedhi@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More Articles & Posts