वसई तील अग्रगण्य “एकता” सहकारी पतसंस्था आणि सी. एल. सी.ऍब्रोड (Study abroad Consultant) कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ,२२ नोव्हेंबर २०२५ रोजी उच्च शिक्षण ( study abroad ) अंतर्गत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा – २०२५ (Study Abroad Fair) आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास २५ देशांच्या विद्यापीठांचे प्रतिनिधी, विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड देशांतील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते; शिवाय स्थानिक सुमारे २०० विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सेमिनारमध्ये हजेरी लावली.
विद्यार्थांना परदेशी शिक्षणाबाबत सर्वच प्रतिनिधींकडून उत्तम मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिरलंय धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर पिटर आल्मेडा यांनी प्रार्थना करून आशीर्वाद दिला. ‘एकता’ पतसंस्थेचे अध्यक्ष मान. फ्रान्सिस ना. लोपीस यांनी प्रास्ताविक केले, तर CLC Abroad कंपनीचे संचालक श्री.स्वप्नील जेरोम कोरीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ‘ एकता ‘ पतपेढीचे संचालक मंडळ आणि कर्मचारीवृंद देखील उपस्थित होते.
परदेशी शिक्षणासाठी कर्ज आणि त्याची परतफेड याविषयी ‘ एकता ‘ पतपेढीच्या अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ‘ एकता ‘ पतपेढीशी संपर्क साधावा.
मोबाईल क्रमांक – 7972884924. / 9130641055















Leave a Reply